हृदय मंदिरात तू (मराठी कविता)

नयनातल्या असावा परी स्वप्नातल्या गोडव्या परी मोगऱ्याच्या परीमला परी श्वासातल्या श्वासात येरझाऱ्या परी तू । मंदिरातल्या ज्योती परी पावसाच्या सरी परी हृदयाच्या कंपना परी मधुर गाण्याच्या सुरा परी कंठात तू । अथांग उठणाऱ्या वादळा परी सैर वैर झालेल्या विचारा परी पुस्तका पुस्तकातल्या कथे परी अथांग फैललेल्या समुद्रा परी मनात तू । हृदय मंदिरात राहावीस तू दूर-दूर असलीस तरीही तू मला आवडीने पहावेस तू मनात राहून चेहऱ्यावर हास्य फुलवावेस तू ।