हृदय मंदिरात तू (मराठी कविता)
नयनातल्या असावा परी
स्वप्नातल्या गोडव्या परी
मोगऱ्याच्या परीमला परी
श्वासातल्या श्वासात येरझाऱ्या परी तू ।
मंदिरातल्या ज्योती परी
पावसाच्या सरी परी
हृदयाच्या कंपना परी
मधुर गाण्याच्या सुरा परी कंठात तू ।
अथांग उठणाऱ्या वादळा परी
सैर वैर झालेल्या विचारा परी
पुस्तका पुस्तकातल्या कथे परी
अथांग फैललेल्या समुद्रा परी मनात तू ।
हृदय मंदिरात राहावीस तू
दूर-दूर असलीस तरीही तू
मला आवडीने पहावेस तू
मनात राहून चेहऱ्यावर हास्य फुलवावेस तू ।
Comments
Post a Comment