जिव्हाळा (मराठी कविता)
जिव्हाळा
वाट पाहून तुझी
डोळे मिटत आहेत
आठवणीने तुझ्या
जीव जात आज आहे
कधी येशील प्रिये
किती वाट पाहू
या पुढे जगू का?
मी मरून जाऊ
पाहतोय वाट असा
चातक पाहतो तसा
तुझ्या विना प्रिये
जगू मी कसा
जशी आलीस मनात
कशी येतेस स्वप्नात
त्याच चोर पावलांनी
कधी येशील जीवनात
जीव जडतांना सखे
माहीत असते असे
माझेच मन माझे
राहत नाही कसे
पाहून वाट तुझी
सुरू झाला उन्हाळा
जगतो एवढ्याच साठी
लागला आहे जिव्हाळा
Comments
Post a Comment