कळतंय का काही
मनुवाद्यांच्या राज्यात
अयोध्येतील मंदिर का मस्जिद
म्हणून भांडण वाढलं
मुस्लिमांच्या मस्जिदला पाडलं
राम आणि रहिम ला
माझा तुझा म्हणून वाटलं
खुर्ची साठी नेत्यांनी
देवाला पण वाटलं
समाजाला धर्मा धर्मात वाटलं
धर्माची मतं मिळतील म्हणून झटलं
राज्यांची पण निर्मिती अशीच झाली
भाषावार राज्याची रचना केली
मराठीना महाराष्ट्रात गाढलं
शिखाना पंजाबला धाडलं
कानडीना कर्नाटक दिला
तसं गुज्जू ना गुजरात दिला
झाली अशी देशाची प्रांतावर रचना
पण ही अशी रचना काहीना भावेना
देशात पाकिस्तानच भांडण वाढलं
पाकिस्तानने काश्मीर साठी नडलं
मंदिर मस्जिदीचं भांडण असं
कबर उकरून काढावी तसं
देवात यांना असथा नाही
देवामुळे मिळते बरेंच काही
जिथे-जिथे खोद काम केले
बुद्धाचे अवशेष प्राप्त झाले
ज्याचं होतं अस्तित्व मोठं
त्याला केलं पंडितांनी खोटं
पाहिला जर विश्व इतिहासाचा साठा
दिसतो विश्वात महामानव बुद्ध मोठा
आणि देशभरातील पुरावे पाहाल जेव्हा
अजिंठा, लेण्याद्री सम गुफा पहाल तेव्हा
पंडितांनी बुद्धांना का म्हणून नाकारलं
बुद्धाचा बालाजी, पांडुरंग का म्हणून केला
बुद्धांनी पंडितांची रोजीरोटी बंद केली
पंडितांनी बुद्धाचा करून देव कमाई केली
बहुजन समाजांनी घ्यावे विचार समजून
बुद्धाचा इतिहास घ्यावा थोडा उमगुन
शिकवण बुद्धाची आचरणात उतरून
दाखवुया 'बा' भिमाचे स्वप्न पूर्ण करून
अयोध्येतील मंदिर का मस्जिद
म्हणून भांडण वाढलं
मुस्लिमांच्या मस्जिदला पाडलं
राम आणि रहिम ला
माझा तुझा म्हणून वाटलं
खुर्ची साठी नेत्यांनी
देवाला पण वाटलं
समाजाला धर्मा धर्मात वाटलं
धर्माची मतं मिळतील म्हणून झटलं
राज्यांची पण निर्मिती अशीच झाली
भाषावार राज्याची रचना केली
मराठीना महाराष्ट्रात गाढलं
शिखाना पंजाबला धाडलं
कानडीना कर्नाटक दिला
तसं गुज्जू ना गुजरात दिला
झाली अशी देशाची प्रांतावर रचना
पण ही अशी रचना काहीना भावेना
देशात पाकिस्तानच भांडण वाढलं
पाकिस्तानने काश्मीर साठी नडलं
मंदिर मस्जिदीचं भांडण असं
कबर उकरून काढावी तसं
देवात यांना असथा नाही
देवामुळे मिळते बरेंच काही
जिथे-जिथे खोद काम केले
बुद्धाचे अवशेष प्राप्त झाले
ज्याचं होतं अस्तित्व मोठं
त्याला केलं पंडितांनी खोटं
पाहिला जर विश्व इतिहासाचा साठा
दिसतो विश्वात महामानव बुद्ध मोठा
आणि देशभरातील पुरावे पाहाल जेव्हा
अजिंठा, लेण्याद्री सम गुफा पहाल तेव्हा
पंडितांनी बुद्धांना का म्हणून नाकारलं
बुद्धाचा बालाजी, पांडुरंग का म्हणून केला
बुद्धांनी पंडितांची रोजीरोटी बंद केली
पंडितांनी बुद्धाचा करून देव कमाई केली
बहुजन समाजांनी घ्यावे विचार समजून
बुद्धाचा इतिहास घ्यावा थोडा उमगुन
शिकवण बुद्धाची आचरणात उतरून
दाखवुया 'बा' भिमाचे स्वप्न पूर्ण करून
Comments
Post a Comment